| वाघ्रण | प्रतिनिधी |
राजकारणाचा दर्जा आणि पातळी अलिकडे घसरली आहे, असे मत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या तथा मिडीया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी खासगी निधीतून उभारण्यात आलेल्या अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड हाशिवरेमार्गे- रेवस या मार्गावरील जांभुळपाडा बस स्थानकाचे उद्घाटन मंगळवारी (दि.2) संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, नरेंद्र पाटील, विश्वनाथ पाटील, हिनेश पाटील, प्रकाश पाटील, वैभव पाटील, केतन पाटील, दयानंद पाटील, भरत पाटील, सुनिल धसाडे, निलेश पाटील, समाधान पाटील, महेश पाटील, अतुल घरत, दत्तात्रेय पाटील, धनुर्धर धसाडे, भुपेंद्र पाटील, प्रभाकर पाटील, पंकज पाटील, दिलीप पाटील, राम पाटील, निलेश पाटील, अशोक पाटील, जयेश पाटील, उदय पाटील, सूरज पाटील, विद्याधर पाटील, गणेश पाटील, राकेश पाटील, मनोज पाटील, गणेश धसाडे, प्रभाकर धसाडे, अमोल पाटील, मुरलीधर पाटील, प्रेमजी पाटील, प्रकाश पाटील, केतन धसाडे, भावेश पाटील, संदीप पेंटर, वसंत पाटील, पद्माकर पाटील, मंगला पाटील, वैशाली पाटील, कंगना पाटील, दयवंती पाटील, पायल धसाडे, वैष्णवी पाटील, धनश्री पाटील, वैशाली पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य विवेक पाटील आणि दिपक पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
यापुढे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, शेकापचे दिवंगत नेते प्रभाकर नारायण पाटील आणि ॲड. दत्ता पाटील यांनी तालुक्यात शिक्षण आणि नोकऱ्या दिल्या असून हे काम आणि विकास पुढे सुरु असल्याचे देखील प्रतिपादन यावेळी चित्रलेखा पाटील यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान पाटील यांनी केले. तसेच चित्रलेखा पाटील यांनी उभारलेल्या बस स्थानकामुळे गेले 30 ते 35 वर्ष जांभुळपाडा गावांतील विद्यार्थी महिला, पुरुष, वृद्ध आणि कामगारांची समस्या दूर केल्याचे सांगत आभार मानले. मत व्यक्त केले. त्यानंतर चित्रलेखा पाटील यांनी गावासाठी बांधण्यात आलेल्या विसर्जन घाटाला भेट दिली व पहाणी केली.
