संभे येथील बस थांबा धोकादायक

। सुतारवाडी । वार्ताहर ।

कोलाड नाक्या पासून एक कि.मी अंतरावर संभे ग्रामस्थांसाठी एस.टी. बस थांबा उत्तम प्रकारे बांधण्यात आला आहे. या बस थांब्याला उत्तम प्रकारे रंगरंगोटी केलेली आहे. मात्र, तीन भिंतीं पैकी समोरील एका भिंतीला भगदाड पडले असून हे भगदाड दिवसेंदिवस वाढत असून धोका निर्माण होत आहे. उन्हाळ्यात सावलीसाठी प्रवासी एस.टी थांब्यात बसतात. भिंतीला पडलेल्या भगदाड वाढत गेला तर छप्पर खाली येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात अनेक प्रवासी बस थांब्याचा आधार घेतात. पावसाळ्या पूर्वी भिंतीला पडलेला भगदाड पूर्ववत करणे आवश्यक आहे.

Exit mobile version