| मुंबई | प्रतिनिधी |
तीन महिन्यात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार मुंबईच्या भायखळ्यामधून उघडकीस आला आहे. याप्रकरणी झाकिरुद्दीन सय्यद आणि त्यांचे दोन मुलगे शाहबाज सय्यद आणि जबिल सय्यद यांच्याविरुद्ध जेजे मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, अनिस खान हे जहाज बांधणीचा व्यवसाय करतात. अनिस खान सांना मोठी रक्कम गुंतवल्यास तीन महिन्यांत लाखोंचा नफा मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर अनिस खान यांनी त्यांना “व्यवसाय कर्ज“ च्या नावाखाली 41 लाख रुपये दिले. मात्र, सय्यद कुटुंबाने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आरोपींनी 41 लाख रुपयांच्या बदल्यात 20 लाख रुपयांचा अतिरिक्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र कालावधीनंतर, मूळ रक्कम किंवा नफा परत मिळाला नाही. खान यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, झाकिरुद्दीन सय्यद यांच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809