बीवीसी ट्रान्सपोर्ट कामगारांचे आंदोलन स्थागित

पगारवाढ मागणी संदर्भात यशस्वी चर्चा
। मुंबई । प्रतिनिधी ।
गणेश आगमनाच्या मुहूर्तावर बी.वी.सी. सेक्युरिटी ट्रान्सपोर्ट व भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वडाला मुंबई कार्यालयात बैठक झाली. सदर बैठकीमध्ये प्रलंबित असलेल्या पगारवाढ मागणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेमध्ये एप्रिल 2021 ते मार्च 2022 या एक वर्षा करिता काही ठराविक रक्कम पगारात तातडीची वाढ देण्यात आली. त्यामुळे कामगारांनी सुरू केलेले आंदोलन स्थगित केले आहे.

सध्या कोव्हिडमुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारल्या नंतर एप्रिल 2022 मध्ये पुन्हा कंपनीचे अधिकारी अध्यक्ष बॉबी जोसेफ व मुख्य व्यवस्थापक महेंद्र पलसोकर , भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव दिलीप जगताप, सचिव प्रकाश शिंदे, कामगार युनिट प्रतिनिधी प्रमोद आंब्रे, नंदकिशोर हाडके, मंगेश चव्हाण, किरण बागवे, सम्राट भाटकर, पराग जाधव, किशोर भगत, सूर्याजी पाटील, रामदास महाडिक, महेश पवार आदी सर्व एकत्र बसून प्रलंबित पगारवाढ मागणी पत्र व इतर प्रलंबित प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करून भा.का.क. महासंघ आणि कंपनी प्रशासन या दोघांच्या सहमतीने योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन देण्यात आले.

Exit mobile version