मुरुड तालुक्यात 8 ग्रा.पं.मध्ये पोटनिवडणुका

मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींमधील 21 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. यासाठी मतदार यादी तयार करण्याचा निर्देश देण्यात आलेलेे आहेत.1 नोव्हेंबरला रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तालुक्यातील वावडुंगी, सावली, एकदरा, राजपुरी,मजगाव, उसरोली,चोरढे, कोर्लेई या ग्रामपंचायतील नागरिकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय यांच्याशी संपर्क साधून मतदार याद्या संधर्भात काही आक्षेप असल्यास कळवावे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुरुड तहसीलदार गोविंद वाकडे यांनी केले आहे.

Exit mobile version