। आगरदांडा । प्रतिनिधी ।
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचे प्रभागनिहाय करण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने मतदार यादी तयार कारण्याचा कालबध्द कार्यक्रम असून त्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडील दि. 1 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्याच्या आहेत.
प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर, हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी 12 नोव्हेंबर व मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर1पर्यत , प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी आहे. त्या अनुषंगाने मुरुड तालुक्यातील 08मतदान केंद्रावर सदर मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता मुरुड तालुक्यातील वावडुंगी,सावली,एकदरा, राजपुरी,मजगाव, उसरोली, चोरढे,कोर्लेई या ग्रामपंचायतील नागरिकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय यांच्याशी संपर्क साधून मतदार याद्या संधर्भात काही आक्षेप असल्यास कळवावे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुरुड तहसीलदार गोविंद वाकडे यांनी केले आहे.