। अलिबाग । वार्ताहर ।
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणार्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे. https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या लिंकच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात. तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना/विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.