। सुतारवाडी । वार्ताहर ।
ग्रामीण तसेच शहरी भागात उनाड गुरांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा मोठा उच्छाद मांडला आहे. याचा वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. वाळंजवाडीपासून विळे भाडपर्यंत रस्त्यावरून अनेक लहान-मोठी वाहने तसेच अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करत असतात. सातत्याने जाणार्या येणार्या वाहनांना या गुरांचा मोठा अडथळा येत असल्यामुळे मार्गक्रमण करताना मोठी दमछाक होत असते. तरी या गुरांचा बदोबस्त करावा, अशी विनंती वाहन चालकांकडून होत आहे.