जातवैधता प्रमाणपत्रासाठी शिबीर

| रायगड | वार्ताहर |

शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर प्रयोजनार्थ सादर केलेल्या जातवैधता प्रमाणपत्र प्रस्तावांच्या त्रूटीपूर्ततेच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात आहे. अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचारी इ. अर्जदारांनी समितीस दाखल केलेल्या अर्जाच्या बाबतीत ज्या अर्जदारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा अर्जदारांसाठी दि.18 ते दि.22 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, 1402 अ, प्लॉट नं.9, स.नं.76/2 ब, सेंटमेरी कॅन्व्हेंट स्कूल मागे, चेंढरे, अलिबाग येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जयंत चाचरकर यांनी केले आहे.

Exit mobile version