| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबागेतील जिल्हा उपनिबंधक, कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ आणि कमळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक व कर्मचारी वर्गासाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा चौल येथील वसुंधरा हॉटेलमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे सचिव संतोष घेराडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे हे होते. तसेच, यावेळी कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके हे देखील उपस्थित होते. दि. 27 व 28 जून रोजी आयोजित या प्रशिक्षण शिबिरात कोकण विभागातील विविध नागरी सहकारी पतसंस्थांचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पतसंस्थांच्या संचालक, कर्मचाऱ्यांसाठी शिबीर
