। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्था यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनल ने सर्व 12 जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षे वर्चस्व असलेल्या कर्जत नागरी पतसंस्थेत पुन्हा एकदा सत्ताधारी पॅनलने यश मिळविले.
कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या 12 संचालक पदांसाठी 30 जून रोजी निवडणूक घेण्यात आली.कर्जत आणि नेरळ येथे पतसंस्था चालवीत असलेल्या कर्जत नागरी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल 20कोटींच्या घरात असून मागील 30वर्षांत या पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले नव्हते.त्यावर्षी सर्व 12 जागांसाठी 19 उमेदवार यांच्यात लढत झाली.त्यासाठी कर्जत आणि नेरळ येथील मतदान केंद्रांवर 375 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.त्या सर्व मतांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी ए ए मदने यांच्या अध्य्षतेखालील मतमोजणी करण्यात आली.