। राबगाव/पाली । वार्ताहर ।
सुधागड-पाली तहसिल कार्यालयात पुरवठा अव्वल कारकून असलेल्या राबगाव येथील रहिवासी उज्जवला अंधेरे- भोईर यांची रोहा तहसिल कार्यालय येथे पुरवठा नायब तहसिलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंधेरे -भोईर यांनी पाली तहसिलसह माणगाव, महाड तहसिल कार्यालयाच्या विभागात मंडळ अधिकारी म्हणून काम केले असून त्यांनी, मडाड येथे पुरपरिस्थितीत अथक मेहनत घेतली होती. रोहा तहसिल कार्यालयात त्यांनी नुकताच पुरवठा नायब तहसीलदारपदाचा कार्यभार स्विकारला त्याप्रसंगी त्याचा रोहा तहसीलदार कविता जाधव, पुरवठा विभागाती कर्मचारी आदीसह रोहा तालुक्यातील रेशन दुकानदारांनी त्याचे स्वागत केले.