संजय राऊत ईडी चौकशीला हजार
। मुंबई ।वृत्तसंस्था ।
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले होते. आज ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले. ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना, पत्रा चाळ कुठेय हेच मला माहीत नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याच प्रकरणी आज चौकशीसाठी ते ईडीसमोर हजर झाले आहेत.
दरम्यान, संजय राऊतांनी आज सकाळी ट्वीट करत ईडी चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती दिली होती. तपासयंत्रणांना सहकार्य करण माझ कर्तव्य आहे, शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी करु नये, असे आवाहन संजय राऊतांनी शिवसैनिकांना ट्वीट करत केले होते. संजय राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी जात असताना शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.