प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर


| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.21) मोफत नेत्र तपासणी, डायबेटिस, हिमोग्लोबीन व जनरल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब अलिबाग, लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित हा उपक्रम सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. अलिबागमधील जलसापाडा येथे शिबीर भरविले जाणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल चोपडा, प्रकाश राठोड, संजय कांबळे, सागर भगत, कपिल अनुभवणे, युगांत म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version