अभियान कॅन्सरमुक्त रायगडचे..

| पेण | प्रतिनिधी |

पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पेण येथे कॅन्सरमुक्त रायगड अभियान राबविले जाणार आहे. अ‍ॅड. मंगेश नेने सी.एस.ई.बी हब, सोबती संस्था, कर्करोग प्रतिबंध विभाग-खोपोली, टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग जनजागृती आणि कर्करोग पूर्व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग यांचा समावेश असणार आहे. प्रथम नोंदणी करणार्‍या 125 नोंदणी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर तपासणी दरम्यान रुग्ण आढल्यास बाधित रुग्णास टाटा मेमोरियल येथे उपचारा पर्यंतची सोय करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात कर्करोग पुर्व तपासणीसाठी कक्ष देखील सुरु करण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणार्‍या 125 नोंदणी धारकांची तपासणी 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 3 च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा कोंबडपाडा येथे होणार असल्याची माहिती आयोजकांकडून एका प्रसिध्द पत्रकानव्ये देण्यात आली आहे.

नोंदणी करण्यासाठी पेण तालुका मॅटर्निटी हॉस्पिटल एच.पी. मेडीसायन्स 8446108708, अमित नवाळे 9130889130, डॉ. नीता कदम 9561096477 यांच्याशी संपर्क करायचा आहे.

Exit mobile version