वाचविण्यासाठी मोहीमेची आवश्यकता

माथेरानचा लुईजा पॉईंट वणव्याच्या भक्ष्यस्थानी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या इको पॉईंटसमोर लुईजा पॉईंट असून, त्या ठिकाणी असलेली गवताची दुलई ही तेथे लागलेल्या वणव्यामुळे काळीसावळी झाली आहे. दरम्यान, वन विभागाने माथेरानचे जंगल वाचविण्यासाठी मोहीम हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. माथेरान हे झाडेझुडपे आणि पशु-पक्षी अशा जंगलाने बनलेला आहे. या ठिकाणी असलेली नैसर्गिक संपदा आणि वनराई तसेच मोठमोठ्या दर्‍या तसेच डोंगर येथून परिसर न्याहाळण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात.

त्यातील बहुसंख्य पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणजे माथेरानमधील काही प्रेक्षणीय स्थळे असून, त्यात शार्लोट लेक आणि इको पॉईंट. इको पॉईंटवरून समोरचा डोंगर आणि त्याखालील दरी तसेच मोरबे धरणाचे पाणी न्याहाळण्यासाठी येत असतात. त्या पर्यटकांचे लक्ष समोर असलेले लुईजा पॉईंटचा परिसर पठार सर्वांचे आकर्षण ठरला आहे. याच लुईजा पॉईंट्च परिसर आणि तेथील पठार हे त्या भागात लागलेल्या वणव्यामुळे काळासावळा बनला आहे. वणव्यामुळे तेथील लालसर गवत आणि वनराई बेचिराख झाली आहे. त्या ठिकाणच्या वनव्यामुळे बनलेला तो परिसर पाहून पर्यटक आणि स्थानिक यांचे मनदेखील हेलावत आहे.

माथेरानमध्ये वन विभागाच्या मदतीला संयुक्त वन व्यवस्थापन समिती अनेक वर्षे काम करीत असून माथेरानचे जंगल वाचविण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून वन विभागाच्या पाठीशी उभे राहून सहकार्य केले पाहिजे, अशी भूमिका समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी मांडली आहे.

वन विभागाने जंगलातील कोणत्याही समस्या बाबत स्थानिक पर्यटक आणि स्टॉलधारक किंवा व्यावसायिक यांची मदत मिळावी यासाठी सर्व प्रेक्षणीय स्थळी वन विभागाची हेल्प लाईनचा क्रमांक यांची माहिती देणारे फलक लावावेत. त्याआधी अशी काही हेल्प लाईन सुरु करता येते काय याचा अभ्यास करावा. – गिरीश पवार, माजी अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती

माथेरान मधील जंगल वाचविण्यासाठी आमचा जगात पहारा असतो. मात्र निसर्ग निर्मित वणवे लागल्यावर तात्काळ त्या त्या परिसरातील नागरिकांनी, पॉईंटवरून स्टॉलधारकांनी आणि जागरूक पर्यटकांनी वन विभागाला कळविण्याची तसदी घ्यावी. त्यावेळी आमचे पथक तेथे पोहचवून वणव्यामुळे लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करेल. – राजकुमार आढे, वनपाल, माथेरान वन विभाग

राज्यभरातील अंगणवाडी सेविका, एसटी कर्मचार्‍यांना राज्य सरकारने दिलासा असून, त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात दीड हजारांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी सरकारने जाहीर केला. तर, एसटी कर्मचार्‍यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेलाच होईल, असे आश्‍वासनदेखील सरकारने दिले आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या पगारासाठी दर महिन्याचा पाच तारखेला 320 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी, एसटी कर्मचार्‍यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version