रोटरी क्लबतर्फे कॅन्सरची तपासणी

| पनवेल । वार्ताहर ।
शुभ द ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, पनवेल होरायझन, खारघर मिडटाऊन व कलंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सुकापूर, आसूडगाव, अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलनी, नविन पनवेल आणि नील आशिमा करंजाडे या सर्व ठिकाणी पार पडलेल्या शिबिरात एकूण 50 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला. कॉल्पो विजनच्या डॉ. अंजली तळवलकर या मुंबईहून तपासणी साठी त्यांच्या टीमसह येथे आल्या होत्या.

या शिबीरात स्तनांमध्ये असलेल्या गाठी, पँप स्मिअर टेस्ट आणि स्त्री रोग तज्ञ यांकडून तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी समज गैरसमज आणि कॅन्सर होऊ नये यासाठी घेऊ लागणारी काळजी यावर डॉ. अंजली यांनी सर्व महिलांचे समुपदेशनही केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज चे अध्यक्ष रुपेश यादव, पास्ट प्रेसिडेंट रो प्रदीप ठाकरे, रो विजय गोरेगांवकर एजी मधुकर नाईक, खारघर मिडटाऊन चे अध्यक्ष डॉ. किरण कल्याणकर, कळंबोली चे अध्यक्ष दिलीप महाडिक, होरीझोन चे अध्यक्ष आणि सेक्रेटरी प्राणिल बारटक्के, स्वप्नील गांधी आणि इतर रोटेरियन व अन्स उपस्थित होते. असे दर महिन्याला एक एक शिबीर आणि कॅन्सर वरील लसीकरण करण्याचे नियोजन पनवेल, खारघर, कळंबोली आणि इतर आसपासच्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे रुपेश यादव यांनी सांगितले.

Exit mobile version