पनवेल | वार्ताहर |
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अष्टविनायक फाऊंडेशन, मुंबई ऑन्कोलॉजी सेंटर (एम.ओ.सी.) आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या संयुक्तपणे 40 वर्षे वयोगटातील स्त्रियांसाठी मॅमोग्राफी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबच्या सर्व अँस यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबारासाठी पनवेल, खांदा कॉलनी, उरण, उलवे, खारघर, कलंबोली आणि मुंबई येथील एकूण 31 महिलांनी लाभ घेतला. हे शिबीर खांदा कॉलोनी येथील अष्टविनायक हॉस्पिटल येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत घेण्यात आले. तसेच कर्करोगासाठी विशेष ओपीडी कक्षाचे उद्घाटन अष्टविनायक हॉस्पिटल येथे डॉ. अक्षदीप अगरवाल, कर्करोग तज्ज्ञ डॉ. स्मित सेठ आणि रोटरीचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. स्मित सेठ यांनी कर्करोगाबद्दल महत्त्वाची माहिती उपस्थितांना करुन दिली.अष्टविनायक हॉस्पिटलचे डॉ. अक्षदीप अगरवाल यांनी रायगडमधील सर्व लोकांना या विशेष ओ.पी.डी.द्वारे अनेक कर्करोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, लवकरच नवीन पूर्णवेळ कर्करोग हॉस्पिटल सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी अष्टविनायक हॉस्पिटल आणि एमओसीच्या मेडिकल टीमसहित रो. विजय गोरेगावकर, रो. प्रदीप ठाकरे, रो. दिलीप जाधव, रो. अर्चना जाधव, क्लबचे सेक्रेटरी रो. बाळकृष्ण आंबेकर आणि रो. विजयकुमार कुलकर्णी हे उपस्थित होते.