पोर्ट रुग्णालयामध्ये कॅन्टीनची सुविधा उपलब्ध

| मुंबई | प्रतिनिधी |

वडाळा येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या हॉस्पिटलमध्ये कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या परिसरात खूप वर्षांपासून कॅन्टीनची सोय नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्‍या आजी माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे सर्व संबंधितांमध्ये कमालीचा असंतोष पसरला होता. अनेक तक्रारी युनियनकडे आल्या होत्या. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व इतर संघटनानी पाठपुरावा केला. याची दखल वरिष्ठ सबंधित अधिकार्‍यांनी घेऊन, युनियन्सच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन हमालेज को. ऑप. कॅन्टीनच्या सहयोगाने हॉस्पिटल परिसरात पुन्हा कॅन्टीनची सुविधा सुरू करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, दत्ता खेसे, कल्पना देसाई, शीला भगत, बबन मेटे, मिलिंद घनकुटकर, डॉ. सुजाता मोकल, रफी कुरेशी आदी उपस्थित होते.

Exit mobile version