टायर फुटल्याने कारचा अपघात

| उरण | वार्ताहर |

जेएनपीए-धुतूम रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या कारचा टायर फुटल्याने अपघात होण्याची दुदैवी घटना मंगळवारी (दि.16) घडली. हा अपघात हा द्रोणागिरी नोड येथील उड्डाणपुलावर झाला. उरण वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत, वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली. या अपघातात वाहनचालक बालंबाल बचावला आहे.

याबाबत हकीकत अशी की, सकाळी ठिक नऊच्या सुमारास धुतूमकडून जेएनपीए- उरणच्या दिशेने जाणार्‍या कारचा टायर फुटल्याने ती रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात कारचालक थोडक्यात बचावला आहे. या अपघाताचे गांभीर्य ओळखून कार चालकास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही याची खबरदारी उरण वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचार्‍यांनी घेतली.

Exit mobile version