| अलिबाग | प्रतिनिधी |
बुधवारी रात्री अर्टिगा कार अलिबाग-बेलकडे रस्त्यावरील नाल्यात घुसली. या कारमधील एकाला दुखापत झाली असून कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजूबाजूच्या तरुणांनी पुढाकार घेत क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली.
बुधवारी (दि.12) रात्री अलिबागकडून रामराजकडे काळया रंगाची अर्टिगा कार (एमएच-04-जीएम-1101) घेऊन चालक जात होता. कुरूळ ते बेलकडेच्या दरम्यान आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी मोरीच्या बाजूला असलेल्या नाल्यात घुसली. सुदैवाने किरकोळ दुखापत झाली. मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले. ही बाब तेथील स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धाव घेऊन क्रेनच्या मदतीने ती कार बाहेर काढली. नाल्याच्या दोन्ही बाजुकडील कठडे खराब झालेले आहेत. त्या ठिकाणी नवीन कठडे बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.