खांबजवळ कारला भीषण अपघात

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावर खांब गावाजवळ दोन कारची सामोरा-समोर धडक लागून अपघात झाला. या धडकेत पाच जण जखमी झाले आहेत. बुधवारी (दि.24) नजीर फकीर (39) खेड-चिपळुन हे इर्टीगा कार (एम.एम-08-झेड-6769) ही वाशी नवी मुंबई येथुन मुंबइ-गोवा महामार्गाने चिपळुन येथे जात असताना खांब गावाजवळ समोरून अचानक महमद आयुब याकुब कुरेशी (एमएच-02-सीएच-6133) कार मुंबई बाजुकडे अतिवेगाने चालवित रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून समोरील गाडीला ओव्हरटेक करीत असताना नजीर फकीर यांच्या इर्टीका गाडीला धडक दिली.

या अपघातामध्ये दोन्ही गाडीमधील पाच जणांना मार लागून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन स पो नि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तसाप सुरू आहे.

Exit mobile version