अलिबागमध्ये अपघाताचा थरार! कार चालकाने चौघांना वेगवेगळ्या ठिकाणी दिली धडक

कार चालक फरार; पोलिसांकडून तपास सुरु
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भरधाव कार चालकाने अलिबाग शहरातील हॉटेल फुलोराजवळ दोन महिलांना धडक दिली. नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो न थांबता कार घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पळून जाताना त्याने आणखी एका एका मोटार सायकललादेखील ठोकर मारली. जखमी महिलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीचा नंबर एम.एच.14 9095 असा आहे. तरी कोणासही या क्रमांकाची गाडी आढळल्यास अलिबाग पोलीस ठाण्यात कळवावे.

सदर कार पांढऱ्या रंगाची असून तिचा पूर्ण नंबर मिळाला नसला तरी एमएच14 9095 असा असल्याचे प्रत्यक्षदर्शी नी सांगितले. सदर कार चालकाला अडवण्याचा प्रयत्न महिलेसोबत असणाऱ्या इसमाने केला असता त्याच्या हाताला चावा घेवून भरधाव वेगात तो पळून गेला. पुढे घरत आळी येथील एका फळ विक्रेत्याच्या हात गाडीलाही त्याने ठोकर दिली. तर रस्त्यामध्ये आलेल्या एका मोटासायकलस्वाराला देखील त्याने उडवल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version