| उरण | वार्ताहर |
उरण येथील मॅजेस्टीक व्हीला, सेक्टर 50, द्रोणागिरी नोड, ता.एम गोल्ड ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी आलेला चोरट्याचा चोरीचा डाव उधळून लागल्याने तो एका इनोव्हा कार घेऊन फरार झाला होता. ती इनोव्हा कार शोधून काढून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पिस्तूल घेऊन आलेला इसम ज्या इनोवा कारमधून पळून गेला होता त्या इनोवा कारचा नंबर एम एच 43 एक्स 7077 असा नंबर असल्याचे दिसून आले. सदर गाडीचे फास्टटॅगला संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरून गाडी मालकाची माहिती प्राप्त करून गाडी मालकाकडे गाडी कोणास दिली होती, याबाबत माहिती घेतली. तेव्हा सदरची इनोवा कार चालक नामे अंकुश अश्रुबा जाधव हा कल्याण- अलिबाग भाडे असल्याचे सांगून गेला होता. त्याला सानपाडा, नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चैकशी केली असता त्याने एजाज अब्दुल करीम चैधरी, याच्या सांगण्यावरुन इनोव्हा गाडी भाडयाने घेतली होती. त्यानंतर मॅजेस्टीक व्हीला येथे येऊन एम गोल्ड ज्वेलर्समध्ये जबरी चोरी करण्याचे इराद्याने हे दोघे आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अंकुश अश्रुबा जाधव, बिलाल अब्दुल करीम चैधरी, शंकर बनारसी चैरासिया या तिघांना अटक केली. एजाज अब्दुल करीम चौैधरी आशिष उर्फ सुरज जिलेंदर सिंग हे फरार आहेत.