कार नदीत कोसळून अपघात

। नाशिक । वृत्तसंस्था ।

नाशिकमध्ये कार पुलावरून नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात शुक्रवारी (दि.05) मध्यरात्री एक कार पुलाचे कठडे तोडून गोदावरी नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version