| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीमधील सेक्टर 6 येथे असलेल्या एका नाल्यात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर मारुती सुझुकी इर्टीगा गाडी नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 6 स्टेशन रोडकडे जाणार्या मार्गावरील प्रणाम हॉटेल समोर असलेल्या नाल्यात मुख्य रस्ता सोडून वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी ही नाल्यात कोसळली असून यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही आहे.