| पनवेल | वार्ताहर |
सापडलेले मौल्यवान पाकीट त्याच्या मूळ मालकास परत करुन पनवेलमध्ये तरुणाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. अनुराग वाघचौरे असे त्याचे नाव असून, मौल्यवान कागदपत्रांसह पाकीट परत मिळाल्याने संबंधितांनी त्याचे आभार मानले. आधारकार्डवरुन ते पाकीट मानगाव येथील मुस्तफा जावेद फोपलुनकर यांचे असल्याचे लक्षात आले. त्यावरील फोन नंबरवर संपर्क साधून त्याने तुमचे पाकीट माझ्या दुकानात राहीले आहे असे सांगितले. पाकीट घेण्यासाठी मुस्तफा पनवेल येथे आले असता पत्रकार मित्र असोसिएशनच्या कार्यालयात अनुरागच्या हस्ते त्यांच्याकडे पाकीट सुपूर्द करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे संस्थापक केवल महाडीक, भागवत अहिरे उपस्थित होते.