कारचा टायर फुटून भीषण अपघात; पाच जण जखमी

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई – पुणे  द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी. 4/400 येथे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीचा टायर फुटून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात गाडीतील पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

अपघातातील वाहन चालक बजरंग सणवारलाल शर्मा (27), रा. रोडपाली कळंबोली हे कार चालवत असताना मुंबई लेन किलोमीटर 4/400 या ठिकाणी आले असता, कारचा पुढील डाव्या साईटचा टायर फुटल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी पहिल्या लेनला पलटी झाली. या अपघातामध्ये गाडीतील ममता बजरंग शर्मा (26), कमलादेवी शर्मा (65), शांती शर्मा (45), माही शर्मा (3) ,अंशुमन शर्मा (6महिने) रा. कळंबोली हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.   

Exit mobile version