। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागमधील नागाव येथे स्टे व्हिस्टा या कंपनीतर्फे त्यांच्या केअर टेकर्ससाठी एक स्तूत्य उपक्रम राबविण्यात आला. कंपनी व नोकरदार हे नाते सोडून या कंपनीत काम करणार्यांसमवेत कौटूंबिक जिव्हाळा निर्माण करीत स्टे व्हिस्टा कंपनीने केअर टेकर्सची केअर करण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम बुधवारी (दि.9) आयोजित केला होता. असा स्टे व्हिस्टा कंपनीच्या बंगल्यांचा सांभाळ करणार्या केअर टेकर्ससाठी कंपनी वर्षातून एकदा हा उपक्रम राबविते. यामध्ये केअर टेकर्सना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कंपनीतर्फे केअर टेकर्ससाठी विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचे सांगण्यात आले.
अंकिता सेठ, प्रणव महेश्वरी, अमित दमानी या तिघांनी एकत्र येत 2015 मध्ये व्हिस्टा रुम ही कंपनी सुरु केली. मात्र केवळ टुरिझम क्षेत्रात कार्य न करता सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत कंपनीने झिराड, किहीम, नागाव, आवास अशा अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. भविष्यातही अलिबागमधील युवकांसाठी तसेच स्थानिकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. यामध्ये 150 ते 200 पुरूषांना ड्रायव्हर म्हणून तर महिलांना अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही ते लवकरच राबविणार आहेत. तसेच जेवण बनविणार्या महिलांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलेला व्यवसायामध्ये कसे रूपांतरित करता येईल यावरही ते काम करणार असल्याचे कंपनीचे सहाय्य्क संचालक ओजस संघानी यांनी सांगितले.