| खोपोली । वार्ताहर ।
वकिली क्षेत्रात करिअर घडविण्यास इच्छुक असणार्या विद्यार्थ्यांचे वकिल होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून (दि.18) लोहाणा समाज हॉल, खोपोली येथे खालापूर तालुक्यातील ज्येष्ठ वकील अॅड.मीना बाम यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना अॅड. मीना बाम यांनी समर्पक उत्तरे दिली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, माधुरी गुजराथी, इशिका शेलार, अखिलेश पाटील, संतोष गायकर, निलम पाटील, जयश्री कुळकर्णी, मोहन केदार, सोहम ढोकळे, आर्या शिंदे, वेदांत मोरे, साहिल जांभळे, सागरिका जांभळे यांनी अथक मेहनत घेतली.