| शिर्डी | प्रतिनिधी |
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील नितीन बावळे यांनी शालेय जीवनात क्रिकेट स्पर्धा गाजविल्या आहेत. त्यांच्या मध्यम गती गोलंदाजीने अनेकदा प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली होती. क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने त्यांचा कसून सराव सुरू होता; मात्र, अपघातात त्यांना एक हात गमवावा लागला होता. सर्व काही संपले असे वाटत असताना, त्यांनी नव्याने भरारी घेतली. त्यांना क्रिकेट प्रशिक्षक नितीन बाराहाते यांचे मार्गदर्शन मिळाले. जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर बावळे यांनी यश खेचून आणले. त्यांची राष्ट्रीय पातळीवर दिव्यांग भारतीय ‘अ’ संघात निवड झाली. एका अर्थाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले. सध्या हैदराबाद येथे राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडीयममध्ये सुरू असलेल्या राजीव गांधी चॅलेंजर सिरीज क्रिकेट स्पर्धेत ते आपल्या मध्यम गती गोलंदाजीची कमाल दाखवीत आहेत.
हात गमावूनही क्रिकेटमध्ये करिअर
