। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल मेगा लिलावानंतर सर्व संघांनी आगामी आयपीएलच्या सरावाला सुरूवात केली आहे. फ्रँचायझींच्या प्रशिक्षण शिबीरालाही सुरूवात झाली आहे. अशातच मुंबई इंडियन्सने विश्वचषक विजेत्या प्रशिक्षकाला ताफ्यात सामील करून घेतले आहे.
इंग्लंडचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन मुंबई संघाच्या प्रशिक्षक संघात सामील झाला आहे. आगामी आयपीएल हंगामात कार्ल हॉपकिन्सन मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहाणार आहे. कार्ल हॉपकिन्सन इंग्लंडच्या 2019 विश्वचषक, टी-20 विश्वचषक 2022 विजेत्या संघातील प्रशिक्षक संघाचा भाग होता. 2000 मध्ये त्याने ससेक्स संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. 2003 साली त्याने स्कॉटलँडविरूद्ध पहिला राष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात त्याने 19 धावा देत 3 विकेट्स घेतले व 67 धावांची खेळी केली. त्याने आपल्या कारकिर्दित एकूण प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण 2705 धावा केल्या आहेत व 2 बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर 92 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1400 धावा व 3 बळी घेतले आहेत. तर, 28 टी-20 सामन्यांमध्ये 165 धावा केल्या आहेत.
कार्ल हॉपकिन्सन मुंबईच्या ताफ्यात
