कार्लोस अलकराझ फायनलमध्ये

| फ्रान्स | वृत्तसंस्था |

कार्लोस अलकराझने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जेनिक सिनेरचा पराभव करत फ्रेंच ऑपनची फायनल गाठली. कार्लोसने जेनिकचा 2-6, 6-3, 3-6, 6-4, 6-3 असा पाच सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात पराभव केला आहे.

स्पेनचा 21 वर्षाचा कार्लोस आता अलेक्झांडर झ्वेरेव किंवा कॅस्पर रूड या दोघांपैकी एकासोबत अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामना हा रविवारी होणार आहे. फ्रेंच ओपनची फायनल गाठणारा कार्लोस हा ग्रँड स्लॅमच्या तीनही सर्फेसवर अंतिम फेरी गाठणारा सर्वात कमी वयाचा टेनिसपटू ठरला आहे. स्पेनच्या या टेनिसपटूने गेल्या वर्षी विम्बल्डनची फायनल आणि 2022 मध्ये युएस ओपनची फायनल गाठली होती. त्याने फायनल जिंकली, तर तो तीन ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात तरूण टेनिसपटू ठरणार आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड स्पेनच्याच राफेल नदालच्या नावावर आहे.

तीनही ग्रँडस्लॅम सर्फेसवर फायनल खेळणारे सर्वात तरूण टेनिसपटू
कार्लोस अलकराझ - 21 वर्षे 1 महिना
आंद्रे आगासी - 22 वर्षे 1 महिना
बजॉर्न बोर्ग - 22 वर्षे 2 महिने
राफेल नदाल - 22 वर्षे 6 महिने
जिम कुरियर - 22 वर्षे 10 महिने
Exit mobile version