ग्राहकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

। पनवेल । प्रतिनिधी ।

मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादात ग्राहकाला मारहाण केल्याची घटना खारघरमध्ये घडली. अहमद मनिहार असे आरोपीचे नाव आहे. जयेश चौधरी यांनी आरोपीच्या दुकानात मोबाईल रिपेरिंगसाठी दिला होता. मोबाईल दुरुस्ती वेळेत न झाल्याने चौधरी यांनी कारण विचारले असता आरोपी आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने चौधरी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी मोबाईल दुकान चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version