| पनवेल | वार्ताहर |
आयफोनची विक्री, बनावट बिले, ग्राहकाकडून स्वीकारलेल्या रोख रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अशोक घराई याच्याविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मयूर गावडे हा स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. त्यांच्याकडे घराई हा कॅश हाताळण्यासाठी आला होता. दुकानांमधून नऊ आयफोनची किंमत बारा लाख 37 हजार 740 रुपये कंपनीच्या बँक खात्यात जमा झाले नसल्याचे निदर्शनास आले. कॅशियरचे कोड पडताळणी केले असता अशोक घराई याने दुकानांमध्ये असलेल्या क्रेडिट कार्ड मशीनमध्ये बनावट लिंक बनवून त्यामार्फत बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बनावट कोड तयार केला आणि नऊ फोन स्टोअरमधून विकले. या आयफोनची विक्री करून त्याने ग्राहकाकडून स्वीकारलेली रोख रक्कम दुकानांमध्ये जमा केली नाही.