। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाणे हद्दीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या माहेरच्यांनी लग्नामध्ये दिलेले स्त्रीधन स्वतःकडे ठेवून त्याचा अपहार केल्याप्रकरणी तिघाजणांविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जानेवारी 2020 ते 5 सप्टेंबर 2022 मौजे कामोठे, शुभधारा सोसायटी, सेक्टर 15, ता. पनवेल येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित महिला या त्यांच्या सासरी असताना तिघांजणांनी मिळून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. तसेच, पीडित महिलेच्या माहेरच्या मंडळींनी लग्नामध्ये दिलेले स्त्रीधन आरोपींनी स्वतःकडे ठेवून ते नजरेआड करून त्याचा अपहार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
