। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
ई-सिगारेट विक्री प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अर्षद मोहम्मद सलीम शेख आणि मिथलेश माणिकचंद साहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघरमधील बेलपाडा येथील सी लाईन आयटीएम कॉलेज जवळील कॅफे नाईन पान शॉपमध्ये अर्षद मोहम्मद सलीम शेख आणि सौरभ पान शॉपमध्ये मिथलेश माणिकचंद साहू यांच्याकडे प्रतिबंधित सिगारेट सापडून आले. यावेळी पोलिसांनी 34 हजारांचे 17 ई-सिगारेट जप्त केले.
पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा आदी परिसरात ई सिगारेट खुलेआमपणे विकले जात आहेत. विशेष करून ज्या ठिकाणी कॉलेज आहेत त्या ठिकाणी या ई-सिगारेटची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. बंदी असलेल्या ई-सिगारेटची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र एखाद दुसरी कारवाई होते. त्यानंतर पुन्हा ई-सिगारेटची त्याच ठिकाणी विक्री होत असल्याचे निदर्शनास येते.
ई-सिगारेट विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
