जमिनीची दुसऱ्यांदा विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| पनवेल | प्रतिनिधी |

जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी नांदगाव येथील 52 वर्षीय शेतकऱ्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित शेतकऱ्याने 8 फेब्रुवारी 2007 रोजी दिनेश शहा यांच्याकडून मोबदला स्वीकारून 14.9 गुंठे जमीन नोंदणीकृत साठेकराराने विकली होती. मात्र, पहिला व्यवहार झालेला असतानाही त्याने हीच जमीन नेरूळ येथील मदन कोळंबेकर यांना पुन्हा विकली. 4 मार्च 2008 रोजी संपूर्ण मोबदला स्वीकारून नोंदणीकृत साठेकरार केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version