बनावट साहित्यप्रकरणी गुन्हा दाखल

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

9 लाख 87 हजार 523 रुपयांचे विविध कंपन्यांचे बनावट साहित्य ताब्यात बाळगून साठेबाजी केल्याप्रकरणी राजेश रघु चाम्रिया यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे पोलीस ठाणे हद्दीत नौपाडा गाव या ठिकाणी ईआयपीआर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या विविध कंपनीच्या लोगो आणि ट्रेडमार्क चिन्हाचा वापर करून बनावट उत्पादने साठा करून विक्रीसाठी ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कंपनीचे अधिकारी आणि पोलीस नौपाडा येथे गेले. त्यावेळी राजेश चामरिया याने गोडाऊन उघडले असता त्या ठिकाणी 9 लाख 87 हजार 523 रुपयांचे विविध कंपन्यांचा बनावट माल सापडून आला.

Exit mobile version