पोलिसांकडून कारवाई
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात ड्रिंक आणि ड्रायव्हच्या केसेस करण्यात याव्या, या आदेशान्वये महाड विभागातील सर्व वाहतूक अंमलदारांनी एकत्र येऊन महाड शहर पोलीस ठाणे महाड तालुका पोलीस ठाणे व महाड एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी एकत्रितपणे महाड शहरातील दादली पूल येथे ड्रिंक आणि ड्रायव्हच्या एकूण तीन केसेस करण्यात आल्या आहेत. यापुढे दारू पिऊन कोणी गाडी चालू नये आणि निदर्शनास आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आवाहन महाड पोलीस अंमलदारांनी केले आहे. यावेळी पोलीस अंमलदार दीपक जाधव, मुकेश पेटारे, तेजस कदम, नारायण तिडके अणि पाटील कारवाईदरम्यान उपस्थित होते.