नेरळ उपअभियंता कार्यालयाची कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील उप अभियंता कार्यालयाच्या कक्षेत वीजचोरी होत असल्याचे सहाय्यक अभियंता यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. महावितरणकडून 320 वीज ग्राहक यांच्याकडे तपासणी केली असता 25 वीज ग्राहक यांच्याकडून वीजचोरी होत असल्याचे उघडकीस झाले आहे. दरम्यान, वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आल्याने वीज ग्राहक आनंदले आहेत.
महावितरणकडून वीजचोरी होऊ नये यासाठी अभियान राबवले जात आहे. त्या माध्यमातून भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड जिल्हा अधीक्षक अभियंता बिक्कड आणि कार्यकारी अभियंता देशमुख यांच्या निर्देशानुसार नेरळ उपविभागात वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. नेरळ उपअभियंता कार्यालयाच्या कक्षेत असलेल्या नेरळ एक आणि नेरळ दोन या ठिकाणी वीजचोरीबाबत मोहीम हाती घेण्यात आली आहे. नेरळ उप विभागीय कार्यालयाचे उपअभियंता राख यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता दीक्षांत वाघ आणि वाघमारे यांच्या कार्यालयांनी महावितरण मधील वीज चोरीची माहिती घेण्यासाठी मोहीम राबविली.
नेरळ-1 व नेरळ-2 विभागांत 320 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वीज अधिनियम 2003 च्या कलम 135 अंतर्गत वीजचोरीची 25 प्रकरणे आढळून आली आहेत. महावितरणच्या महावितरण वीजचोरी विरोधी पथकाने एकत्र येत वीजचोरी उघड केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करताना वीजचोरी करणाऱ्या 25 वीज ग्राहक यांच्या विरुद्ध वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वीजचोरीला आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे.






