जातीचा दाखला कॅम्पचे आयोजन

। अलिाबाग । वार्ताहर ।
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी समाज कार्यकर्ते, उरण सामाजिक संस्था आणि सापोली वाडीतील तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सापोळी आदिवासी वाडी येथे मोफत जातीचा दाखला काढण्याचे कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळ अधिकारी मोकल अण्णा उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र मडवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि वनवासी कल्याण आश्रम चे थोरात सर आदिवासी विकास प्रकल्पाचे निरीक्षक भानुशाली चव्हाण, सावरई ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला हीलम, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, वाडीतील सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी समाज कार्यकर्ते दत्ता शिरसाट, प्रमिला भिलारे,ख् अंकुश माडे, पायल आंब्रे, आदी उपस्थित होते.

यावेळी 205 जातीच्या दाखल्यासाठी परिपूर्ण फॉर्म भरून घेतले हे फॉर्म भरण्यासाठी सापोळीं आदिवासी वाडी, पिंपळवाडी, गावठान वाडी ई.वाडीच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात कातकरी आदिवासी समाज आता लुप्त होत चालला आहे. हा समाज टिकला पाहिजे त्यांची संस्कुती टिकली पाहिजे आणि त्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक विविध प्रयत्न केले जातात. या आदिम समाजाच्या विकासासाठी शासनाने कातकरी उत्थान कार्यक्रमाची निर्मिती केली. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायात स्तरावर सप्तसुत्री कार्यक्रम विविध वाड्यावर जाऊन घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार डोईफोडे, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, सुशील साईकर आणि उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी यांच्या मार्गर्शनाखाली सापोळीं वाडी पेण येथे जातीचे दाखले काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला आणि 205 दाखल्यांसाठी परिपूर्ण फॉर्म भरण्यात आले.

Exit mobile version