स्वार्थासाठी जातीधर्मात फुट पाडू नये

आ. योगेश कदम यांचे प्रतिपादन
। खेड। प्रतिनिधी ।
स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जातीधर्माच्या आधारे माणसांमाणसांमध्ये फुट पाडू नका, त्यासाठी शिवसैनिक माफी देणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेना आ. योगेश कदम यांनी केले आहे. खेड दापोली मंडणगड येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी स्वकीयांचा तसेच विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.
आ.कदम म्हणाले की, शिवसेना प्रमुखांनी सर्वधर्म समभाव, मराठी माणसाला एकत्र करुन शिवसेना हे कटूंब तयार केले आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हम सब एक है हा संदेश दिला आहे. अशा एकजीव झालेल्या संघटनेत जातीयतेचे विष कालवून स्वतःचा स्वार्थ साधू नका. तरीही तुम्ही संधी साधूगणा केलात तर मा. बाळासाहेबाचा शिवसैनिक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

Exit mobile version