| मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील मजगाव येथील श्रीशिवप्रेमी शिवभक्त मित्र मंडळ व युवा संस्कार ग्रुपतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यासाठी तालुका स्तरावरील विशेष किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले बांधणीची संकल्पना शिवदुर्ग विज्ञान व गडकिल्ल्यांची नाविन्यपूर्ण कल्पना अशी असून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवदुर्ग विज्ञान ज्ञात व्हावा, गडकिल्ल्यांची माहिती व्हावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन केले जाते अशी माहिती मंडळाचे आशिष बुल्लु यांनी दिली.
इच्छुक स्पर्धकांनी 21 ऑक्टोबर पर्यंत नोंदविणे आवश्यक असून किल्ले 23 ऑक्टोबर पर्यंत बांधून पूर्ण केले पाहिजेत. ते नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करावेत, प्लॅस्टिकचा वापर करु नये, किल्ल्यांची उपयुक्तता व ऐतिहासिक माहिती सांगणे आवश्यक आहे. 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान परीक्षण करण्यात येईल.
स्पर्धक हे इयत्ता चौथी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणारे असावेत. नाव नोंदणी व संपर्कासाठी नाथा गिरणेकर मो. नं.9225487844, समिर माळी 8237702595, आशिष बुल्लु 8237275668, शनिकेत भोईर 8983092048, नितेश कांबळे 8149245358 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.