| रायगड | प्रतिनिधी |
कास्टट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या जिल्हा शाखा रायगड यांची विविध प्रलंबित मागण्यांबाबतची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.
या सभेत भरती, अनुकंप नोकरी, बदली, निलंबन आधी विषयांवर संघटनेसमवेत चर्चा करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रश्न तात्काळ निकाली काढून त्याची माहिती देण्याचे आश्वासन दिले. सदर सभेत जि.प. प्रशासन, महसूल व इतर सर्व अधिकारी व संघटनेचे सुरेश तांबे महासचिव सुमित भुईगळ, उपाध्यक्ष संजीव मोरे, रायगड जिल्हा अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, तहसील कार्यालय कर्जत मनोज कांबळे, राज्य कार्याध्यक्ष सुशील बनकर, मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष व जि.प.मधील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.







