दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष आणि बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्था यांच्यावतीने गुरुवारी, (दि. 19) सकाळी 11 वाजता पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये पनवेल तालुक्यामधील पनवेल, खांदा कॉलनी, कलंबोली, कामोठे, खारघर, आणि पनवेल ग्रामीणमधील बारावी आणि दहावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या 610 विद्यार्थ्याचा आणि 67 शिष्यवृत्ती पास विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे त्यांचा उत्साह वाढवणे ही शेतकरी कामगार पक्षाची परंपरा आहे. यापुढे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी काही अडचण आलीच तर त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशिनाथ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, काँग्रेस पनवेल जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना उभाठा गटाचे पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रा.गो. पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, जी.आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास तज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशांत देशमुख यांनी आपल्या उत्कृष्ट भाषण शैलीद्वारे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांना असणारी आवड ही लक्षात घेऊन त्याचप्रमाणे त्यांचं करिअर घडवावे, असे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी आणि बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्थेचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.