मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, प्रसोल केमिकल लिमिटेड होनाड,आर आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल, वरद विनायक देवस्थान महड आणि खालापूर तालुका पत्रकार संघ यांचा संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडला. या शिबिराचा 179 नागरिकांनी लाभ घेतला. याचवेळी प्लास्टिक मुक्त महड हि संकल्पना म्हणून प्रसोल केमिकल लिमिटेड व पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांचातर्फे कापडी बॅग वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, निलेश नारायण जाधव नियती एंटरप्रायझेस, रविद्र भोपी, संतोष गुरव, श्वेता संतोष गुरव, नगरसेविका खालापूर, जयवंती रवींद्र भौपी माजी सरपंच खालापूर, राजेश गावडे, दीपक मिरकुठे,अनंत पाटील ,कैलाश पाटील, नामदेव पाटील, दर्शन पवार इत्यादी पाहुणे उपस्थित होते.

Exit mobile version