दाभोलकर हत्याकांडाचा सीबीआय तपास पूर्ण

| मुंबई | प्रतिनिधी |
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकार्‍यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला आहे. येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

डॉ. नरेंद्र हत्या प्रकरणी 30 जानेवारी उच्च न्यायालयाचे न्या.अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा अनिल सिंग यांनी सांगितलं की, डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. 32 पैकी 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्याची गरज नाही. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात अहवाल पाठवण्यात आला आहे. यावर तीन आठवड्यांत सीबीआय आपला निर्णय जाहीर करेल, असे सिंग म्हणाले.

Exit mobile version