जातीय सलोखा राखून ईद साजरी करा

| पनवेल । वार्ताहर ।

आगामी येणार्‍या रमजान ईद निमित्त पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मशीद ट्रस्टी व मौलाना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी जातीय सलोखा अबाधित ठेवून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून रमजान ईद साजरा करण्याची सूचना उपस्थितांना दिली.

या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेळकर, राजेंद्र कुवर, पंकज शिंदे आदींसह पनवेल तालुका हद्दीतील मशीद ट्रस्टी व मौलाना उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी उपस्थितांना आक्षेपार्ह पोस्टर्स/ बॅनर लावू नये, धार्मिक तेढ निर्माण होईल असे भाषण करू नये, मशिद जवळ वाहन पार्क करू नये, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, सोशल मीडियावर/ व्हाट्सअपवर काही आक्षेपार्ह विधानबाबत माहीती मिळाल्यास पोलिसांना माहिती द्यावी, न्यायालयीन आदेशानुसार स्पीकरचा वापर करावा, आक्षेपार्ह वस्तू, वाहने, इसम, इत्यादी आढळून आल्यास पोलीस ठाण्याची संपर्क साधावा अशा सूचना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मशीद ट्रस्टी व मौलाना उपस्थित होते.

Exit mobile version