धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यात सम्राट अशोका विजयादशमी अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व उपशाखा तसेच तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगड या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळाचे भिमराज सोनू जाधव हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तळा शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मानव आदर्शांच्या मूर्तींना मान्यवरांच्या हस्ते पुष्प मालिका अर्पण करण्यात आली. तसेच, यावेळी समता सैनिक दलाचे महिला व पुरुष जवान व उपस्थित भीम अनुयायी यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित उपासक, उपासिका यांनी सामुदायिक वंदना, त्रिसरण, पंचशील व बुद्ध पूजा पाठ घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमात तळा तालुक्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच महिला अशा एकूण 18 जणांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिनाचे महत्त्व आपल्या गीतातून व वक्तृत्वातून व्यक्त केले.

Exit mobile version